दिपावार विनस हॉटेल टपऱ्यांवर गटख्याची विदेशी सिगारेटची विकी

कायद्याची भीडभाड न बाळणाऱ्या टपरी चालकावर शासनाच्या नव्या नियमाप्रमाणे मोक्काअतर्गत कारवाई करा!


पनवेल, १० फेब्रु. (वार्ताहर) : पनवेल शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात गुटखा विक्रीस त्याचप्रमाणे विदेशी सिगारेट विक्रीवर, विकणाऱ्यावर बंदी असतानाही पनवेल शहरातील दिपा बारशेजारील टपरी त्याचप्रमाणे विनम्र हॉटेलशेजारील टपरी येथील टपरी चालक रात्रीच्या वेळी पिशव्या भरुन मोठ्या प्रमाणात गुटखा व विदेशी सिगारेट बिनधास्त शासनाचे नियम धाब्यावर बसवून विकत असल्याने त्यांच्यावर पनवेल शहर पोलिसांनी, महानगरपालिका व अन्न औषध प्रशासनाने धडक कारवाई करून सिव्हीलशासनाच्या नव्या नियमाप्रमाणे मोक्कांतर्गत कारवाई करावी व त्यांना धडा शिकवावा अशी मागणी महिलावर्गाकडून करण्यात येत आहे.


             


शहरातील दिपा बारशेजारील अँथोनी याची टपरी त्याचप्रमाणे विनम्र बारशेजारील छोटेलाल याची टपरी पनवेल शहर पोलीस, महानगरपालिका व अन्न औषध प्रशासनाने धडक कारवाई करून सिल केलेली असतानाही सर्व नियम धाब्यावर बसवीत त्या टपरीच्या बाहेर सायंकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात पिशव्या भरुन गुटखा, सुगंधी मसाला व विदेशी सिगरेट तसेच इतर मादक येत पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात येत असून बिनदिक्कतपणे त्याचा हा धंदा सुरू आहे. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तर आहेच, त्याचप्रमाणे तसेच तरुण पिढीला व्यसनाच्या अधीन करणारी ही संस्कृती , थोपवायलाच पाहिजे असा महिलावर्गाचा सवाल असून संबंधित करून शासनाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी छापे टाकून सदर दोन्ही व्यक्तींविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.